दि.१ ( पीसीबी ) राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे .या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत आहे . या योजनेत लाडक्या बहिणींच्या जवळपास 2 लाख अर्जांची छाननी केल्यानंतर राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे. या योजनेत अनेक बोगस लाडक्या बहिणींची आता पोलखोल होणार आहे. राज्यभरात नेमक्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे. ही माहिती मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारचा केंद्रशी संपर्क सुरू आहे. या माहितीवरून लाभार्थी महिलांची पडताळणी करून अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेसाठी अपात्र असलेल्या २२०० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचं सांगितलं होतं. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील नियमित प्रक्रिया आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत पडताळणीची प्रक्रिया राबवली जात असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं .या प्रक्रियेत जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर जवळपास २२८२ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं . यानंतर अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांसाठी बंद केली जाणार आहे .आता राज्यभरात किती पात्र महिला आणि किती अपात्र महिला आहेत याची सगळी माहिती राज्य सरकारला आयकर विभाग देणार आहे . त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत या डेटाची मदत होणार आहे .
या योजनेत सुमारे दोन कोटी ६५ लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती .त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत आहेत . या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी २० लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे .
कोणकोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवण्यात आलं ?
2.30 लाख महिला – संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी
1.10 लाख महिला – वय 65 वर्षांहून अधिक असल्याने
1.60 लाख महिला – चारचाकी वाहनं असल्यामुळे
7.70 लाख महिला – नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या असल्याने
2,652 महिला – सरकारी सेवेत कार्यरत असल्याने
लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट २०२४ ला राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा १५०० रुपयांची मदत या योजनेतून देण्यात येते .ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सामान्य मर्यादेपेक्षा जास्त असते त्यांना या योजनेअंतर्गत देयके देणे अपात्र ठरते