लाज नाही का वाटत. तीच राम मंदिराची घंटा डोक्यात घातली पाहिजे…

0
267

देश , दि. २२ (पीसीबी) -पूँछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या गाडीवर गुरुवारी (दि.२१) दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. तर, तीन जवान गंभीर जखमी आहेत. लष्कराकडून राबवत असलेलेल्या शोधमोहिमे दरम्यान लष्कराच्या गाड्यांना लक्ष्य केले. यावरून आता केंद्र सरकारवर संजय राऊत कडाडले आहेत. जवानांची कत्तल उघड्या डोळ्यानी पाहून राममंदिराच्या घंटा वाजवयला जायचं. लाज नाही का वाटत. तीच राम मंदिराची घंटा डोक्यात घातली पाहिजे, असे म्हणत राऊतांनी सरकारला लक्ष्य केले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुलवामाचा हल्ला झाला होता. त्यात सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर मोदी सरकारने केलेल्या कारवाईने त्यांना लोकसभेत मोठे यश मिळाले होते. तोच धागा पकडून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी (Narendra modi ) यांना लक्ष्य केले. हा जो हल्ला झाला आहे तो पुलामा सारखाच आहे. सरकारला २०२४ ची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सैनिकांच्या हल्ल्याचे राजकारण करायचे आहे का? असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

१५० खासदारांची निलंबन करून सरकार आनंदोत्सव साजरा करत होते मात्र, जम्मू कश्मिरमध्ये पाच जवान शहीद झाले. गेल्या दोन महिन्यात कश्मिरमध्ये १०० जवान शहीद झाले आहे. सरकारला लाज नाही का वाटत. देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला, असे राऊत म्हणाले. सैनिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधीपक्ष सरकारवर टिका करत आहेत. माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांनी देखील सैनिकांवर झालेल्या हल्ल्यावरून सरकारवर टिका केली. 370 कलम हटवल्यानंतर देखील हल्ले होतायेत. सरकारला सैनिकांची काळजी नाही, असे अब्दुला म्हणाले.