लाखो लोकांचा मृत्यू होणार असल्याची 2025 साठी युवकाची भविष्यवाणी

0
19

लंडन ,दि. ३ (पीसीबी) :संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु या नवीन वर्षात जगात काय होणार? त्याबाबत बाबा वेंगा यांनी भविष्य वर्तवले आहे. बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु एका 38 वर्षीय व्यक्तीची भविष्यवाणी खरी ठरत आहे. या व्यक्तीने 2018 मध्ये कोरोना सारखी महामारी येणार असून त्यात लाखो लोकांचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले होते. आता त्याने 2025 साठी भविष्यवाणी केली आहे.

तिसरे महायुद्ध होणार
लंडनमधील हिप्नोथेरेपिस्ट निकोलस ऑजुला याने 2025 मधील भविष्याबाबत सांगितले की, 2025 मध्ये तिसरे महायुद्ध होणार आहे. या वर्षभरात कुठे दयाभाव दिसणार नाही. धर्म आणि राष्ट्रवादाचा नावावर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होणार आहे. राजकीय लोकांच्या हत्या होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्‍टार्मर यांची सत्ता जाणार आहे. तसेच प्रिन्स व्हेलियम आणि हॅरी यांच्या दरम्यान समझोता होणार आहे.

विज्ञानात काय होणार
निकोलस ऑजुला याने विज्ञानात होणाऱ्या बदलाबाबत सांगितले आहे. या वर्षी प्रयोगशाळेत कृत्रिम अवयवांची निर्मिती यशस्वी होणार आहे. तसेच महापुराच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. समुद्राचा जलस्तर वेगाने वाढणार आहे. त्यामुळे अनेक शहरे पाण्यात बुडणार आहे. या वर्षी महागाईचा उच्चांक असणार आहे.