लाखो रुपयांचा इन्कम टॅक्स भरत असाल तर हे नक्कीच वाचा, कर वाचविण्याची मोठी शक्कल

0
35

नवी दिल्ली, दि. 02 (पीसीबी) : आयकर विवरणपत्र भरताना प्रत्येक​ व्यक्ती​ कर ​(टॅक्स) कसा वाचवायचा​ याचा विचार करतो.​ कर वाचवण्यात सर्वात मोठे योगदान विविध भत्त्यांमधून ​होते जे करमुक्त ​असतात आणि ​तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी ​महत्त्वाची भूमिका बजावतात.​ अशा परिस्थितीत,​ जेव्हा तुम्ही​ नोकरीत​ रुजू व्हाल तेव्हाच​ तुमच्या पगारात सर्व भत्ते ​सामील केले पाहिजे. तसेच तुम्ही​ तुमचा पगार मध्येच बदलून देखील ​भत्त्यांचा फायदा मिळवू शकता, ज्यासाठी तुम्हाला​ तुमच्या कंपनीच्या एचआरशी बोलावे लागेल.

घरभाडे भत्ता (HRA)
अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देतात. यामध्ये तुमच्या मूळ पगाराच्या ४० ते ५०% समावेश होतो. तुम्हाला तुमच्या कंपनीकडून घरभाडे भत्ता मिळत नसेल तर, ताबडतोब एचआरशी बोला आणि कर वाचवण्यासाठी तुमच्या पगारात HRA चा समावेश करा.

ट्रॅव्हलिंग किंवा कन्व्हेन्स भत्ता
ट्रान्सपोर्ट भत्ता किंवा ट्रॅव्हल भत्ता किंवा कन्व्हेन्स भत्ता तुमच्या ऑफिस आणि घरा दरम्यानच्या प्रवासाचा खर्च कव्हर करतो. बहुतांश कंपन्या हा भत्ता कर्मचाऱ्यांना पगारात देत असल्या तरी काही कंपन्या देत नाहीत. तुमच्या पगारात हा भत्ता समाविष्ट नसेल तर लगेच समाविष्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्या पैशावर कर भरावा लागणार नाही आणि तुम्हाला फायदा होऊ शकेल.

फूड कूपन किंवा एंटरटेनमेंट भत्ता
फूड कूपन किंवा जेवण व्हाउचर किंवा सोडेक्सो कूपन देखील तुमचा कर वाचवू शकतात. काही कंपन्यांमध्ये याला मनोरंजन एंटरटेनमेंट) भत्ता देखील म्हणतात. अनेक कंपन्या दरमहा सुमारे २०००-३००० रुपये मनोरंजन भत्ता देतात. तुम्हाला फक्त कंपनीला फूड बिल दाखवावे लागेल आणि तुम्हाला कोणतेही टॅक्स न कापता पैसे परत मिळतील.

कार देखभाल भत्ता
काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार देखभाल भत्ता देखील देतात ज्यामध्ये कर्मचाऱ्याला गाडीची देखभाल, डिझेल किंवा पेट्रोलचा खर्च आणि ड्रायव्हरचा पगारही दिला जातो. तुमचाही कारचा खर्च जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआरशी त्याबद्दल बोलू शकता. तुम्हाला कार मेंटेनन्स भत्ता मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागणार नाही.

मोबाईल फोन आणि इंटरनेट भत्ता
या अंतर्गत तुम्हाला मोबाईल फोन आणि इंटरनेट बिलांची परतफेड करता येते. म्हणजेच यामध्ये तुम्ही जो खर्च करता तो, कंपनी तुम्हाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कोणताही कर न कापता देते. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न कमी होते आणि तुम्हाला फायदा होतो.

लीव्ह ट्रॅव्हल भत्ता
हा भत्ता अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देतात. या अंतर्गत तुम्हाला कुठेही जाण्यासाठी भत्ता दिला जातो. तुम्ही चार वर्षांत दोनदा मोठ्या प्रवासावर जाऊ शकता आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लिव्ह ट्रॅव्हल भत्ता अंतर्गत तुमच्या खर्चाची परतफेड करू शकता ज्यामुळे तुम्हालाही प्रवास करायला आवडत असेल आणि तुमच्या पगारात LTA समाविष्ट नसेल तर, लगेच समाविष्ट करा आणि कर वाचवा.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)
ईपीएफ कायद्यानुसार कंपनी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आणि भत्त्यांपैकी १२% EPF मध्ये जमा करते. कंपनीलाही तेवढंच योगदान देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांच्या योगदानावर दीड लाखांपर्यंत प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत उपलब्ध आहे. तर, यावर मिळणारे व्याज देखील करावरही सवलत दिली जाते.

गिफ्ट व्हाउचर
काही वेळा कंपन्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देतात, ज्यावर कर सूट मिळते. मात्र, अट अशी आहे की त्याचे एकूण मूल्य वार्षिक ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, तरच कर सूट मिळू शकेल.

युनिफॉर्म भत्ता
अशा खूप कमी कंपन्या आहेत ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता देतात. तुम्ही तुमच्या कंपनीशी बोलू शकता आणि तिथे युनिफॉर्म भत्ता उपलब्ध असेल तर, तुम्ही तुमच्या पगारात समाविष्ट करून शकता. हे पैसे कंपनी कर्मचाऱ्यांना गणवेशाची किंमत राखण्यासाठी देते, ज्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

शिक्षणवसतिगृह भत्ता
तुमचे मूल असल्यास तुम्ही त्याच्या वय आणि पात्रतेनुसार शिक्षण किंवा वसतिगृह भत्ता मिळवू शकता. याबद्दल तुमच्या एचआरशी बोला आणि तुम्हाला या भत्त्याचे फायदे कसे मिळवायचे याची माहिती मिळवा.