लाकडी पहाडावरून पडून कामगाराचा मृत्यू

0
264

चाकण , दि. 29 – बांधकामावर काम करत असलेल्या एका कामगाराचा लाकडी पहाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली.

सुर्यकांत गणेश बाशिंगे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुर्यकांत यांच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर नरसिंह जाधव (वय 35, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव याने बाशिंगे यांना भोसरी नाका येथून नाणेकरवाडी येथे बांधकामावर मिस्त्री म्हणून कामाला नेले. बांधकामावर कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी जाधव यांनी घेतली नाही. इमारतीला प्लास्टर करण्यासाठी बांधलेल्लाय लाकडी पहाडावरून बाशिंगे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.