लहान मुलाला पॉर्न व्हिडीओ दाखवत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

0
126

पुणे, दि. ५ : पुण्यात अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच असून या सर्व घटना हादरवून सोडणाऱ्या आहेत. कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या लहान मुलाला पॉर्न व्हिडीओ दाखवत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. कोंढवा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. पीडित मुलगा सोसायटीत खेळत होता. त्यावेळी या तिघांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ त्याला दाखवले. त्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोर हे अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.