लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
147

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली आहे. या भांडणात मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. ही घटना रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इरफान मोहम्मद खान (वय 34 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्सयानुसार समीउद्दीन उर्फ समसू झिनकू खान (वय 18), शहाबुद्दीन झिनकू खान (वय 23 रा.चिखली), उस्मान नशीबउल्ला खान (वय 20) या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शमशुद्दीन खान, महिला आरोपी, कुतबुद्दीन खान,रियाज उद्दीन खान, आजार उद्दीन खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला समशुद्दीन खान याच्या लहान मुलाने मारले होते. याचा जाब विचारायला फिर्यादी व त्यांची बहीण गेली होती. यावेळी या वादाचे रुपांतरण भांडणात झाले व आरोपींनी एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. फिर्यादी देखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

याच्या परस्पर विरोधात शहाबुद्दीन झिनकू खान यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान खान, कमरान खान, वहीद खान, अल्ताफ तसवर आली, वसिम रईस खान, रिजवान मन्नोवरनुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अल्ताफ, वसीम आणि रिजवान यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान याची बहिण फिर्यादी यांच्या घरी आली. तिने लहान मुलांच्या खेळण्यावरून भांडण केले. याबाबत तिने आरोपी इरफान याला सांगितले. इरफान याने त्याच्या साथीदारांना घेऊन येत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला काठी, पाईप, कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.