“लहानपण देगा देवा” याची गोड अनुभूती रायझिंग स्टार एज्युकेशनच्या स्नेहसंमेलनात पालकांनी अनुभवली

0
138

पिंपरी,दि. ३० (पीसीबी)- पिंपळे गुरव येथील द रायझिंग स्टार एज्युकेशन या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी छोट्या मुलांनी विविध कलाविष्कार सादर करीत उपस्थित सर्वांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सर्वांनीच लहानपण देगा देवा.. याची अनुभूती घेतली.

डॉ. विवेक मुगळीकर (एसीपी) प्रकल्प अधिकारी डॉ. प्रेम हनवटे, उपनिबंधक सुमीत थोरात, सत्यशोधक फिल्मचे लेखक – दिग्दर्शक प्रवीण तायडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घरडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, पर्यावरणतज्ज्ञ तानाजी एकोंडे, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, मुंबई येथील सेंट्रल रेल्वे हेडक्वार्टरचे पर्सनल ऑफिसर बाबूलाल रामटेके,

मुंबई येथील सेंट्रल रेल्वे हेडक्वार्टरचे पर्सनल ऑफिसर राजेंद्र परदेशी, मुंबई येथील सेंट्रल रेल्वे हेडक्वार्टरचे पर्सनल ऑफिसर रमेश नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रणाली झोंबाडे यांनी गणेशवंदना सादर केली. छोट्या मुला-मुलींनी बहारदार नृत्ये सादर केली. छोट्या मुलांनी सादर केलेली ‘वृद्धाश्रम’ ही नाटिका पाहून उपस्थितांचे हृदय हेलावले. बालचमुंनी पर्यावरणाचे प्रबोधनात्मक संदेश दिले. देशभक्तिपर गीते सादर केली. नात आणि नातू यांच्या समवेत छोट्या मुलामुलींचे आजी आणि आजोबा यांना व्यासपीठावर बोलावून हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला. शाळेच्या संचालिका मनस्वी झोंबाडे, सविता झोंबाडे, स्नेहल झोंबाडे, आप्पा लोणकर, लता लोणकर, ज्ञानेश्वर झोंबाडे, आनंद तांडे, सोनाली शेवाळे, वैभवी भालेराव, स्नेहल बोत्रे, सोनल मालखेडे, पूजा यादव, अनिता इंगळे यांनी परिश्रमपूर्वक संयोजन केले.
आभार विवेक चव्हाण यांनी मानले.