मुंबई, दि. २९ (पीसीबी) – अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये सलग चार महिन्यांपेक्षा जास्त काळ उपचार सुरु होते. गोपनीय बाब असल्याच्या नावाखाली ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याविषयी आजवर बोलणे टाळले होते. अखेर पोलिसांनीच कैदी वॉर्डमधील वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्या असता धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण अधिकच गंभीर होत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी सुरु असून अनेक धागेदोरे समोर येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणात कोणालाही सोडणार नाही, ज्या पोलिसांचा यात सहभाग आढळून येईल त्यांना बडतर्फ करणार असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी ललित पाटील प्रकरणावर भाष्य केलं. गेल्या 15 वर्षात देशात आणि महाराष्ट्रात ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत सर्वच राज्यांच्या डीजींसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच, त्यासंदर्भात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात अँटी ड्रग्ज कमिटी तयार केली. त्याच पार्श्वभूमीवर मी पोलिसांना ड्रग्स फ्री महाराष्ट्र हा सिंगल लाईन अजेंडा दिला, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच ललित पाटील प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. उचचली जीभ लावली टाळूला, असं काहीचं काम आहे. कुठलाही पुरावा नाही.
ड्रग्स माफिया ललित पाटील अटकेच्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिक जिल्हाप्रमुख होता.
तो नाशिकचा शिवसेना प्रमुख असल्याने 2021 साली अटक झाल्यानंतर
त्याला 14 दिवसांची पोलीस कस्टडी असताना तो 14 दिवस रुग्णालयातच होता.
आता सखोल चौकशी सुरु आहे. यातील धागेदोरे समोर आले आहेत.
एकालाही सोडणार नाही… आम्ही निर्णय घेलाय, मी मुख्यमंत्र्यांशीही बोललोय. जे पोलिसवाले याच्यात थेट इनव्हॉल्व दिसतील,
त्यांना सस्पेंड नाही करणार त्यांना थेट 311 खाली बडतर्फ करणार, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे