ललित कला केंद्रात तोडफोड, भाजप युवा मोर्चाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

0
290

पुणे, दि. ४ (पीसीबी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात गोंधळ घालून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक जगन्नाथ खरमाटे यांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निखिल राजेंद्र शिळीमकर, शिवम मारुती बालवडकर, किरण चंद्रकांत शिंदे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले.