लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?,

0
237

नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. यावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.

जरांगेंनी भुजबळांना सुनावलं.

भोरमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली. त्यानंतर याचा आधार घेत येवल्यावरून आली का काय?, असं म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना सुनावलं.

मी सगळे तुमच्या ताकदीवर नीट केलेले आहेत. पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय.