लटके प्रकऱणात आमचा कुणावरही दबाव नाही – देवेंद्र फडणवीस

0
158

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस म्हणाले की नियम सर्वांसाठी सारखे आहे. कोणताही दबाव आणला जात नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान महापालिका पूर्णपणे स्वयत्ता आहे. राजीनामा घेण्याबाबत त्यांचे निर्णय आहे. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. आमच्याकडून ही कोण निवडणूक लढणार याची घोषणा आम्ही लवकरच करू, असंही फडणवीस यांनी म्हटलं.