लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, निवडणूक आली की आम्ही ओबीसी

0
3

दि.१३(पीसीबी)-राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा राजकीय पटलावर नव्याने सुरु झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यानंतर ओबीसी समजाने राज्य सरकारविरधोत आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही समजाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच, लक्ष्मण हाकेंनी लग्नाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे पाटलांना डिवचले आहे.

लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय, जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत, अशा शब्दात हाकेंनी मराठा समाजावर हल्लाबोल केला.

बीड जिल्ह्यातील गेवराईतील शृंगारवाडी येथे पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हाके बोलत होते. यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले. तसंच या मेळाव्यात बोलताना त्यांनी थेट ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.

जरांगेंना दिला लग्नाचा प्रस्ताव

हाके म्हणाले आता तुम्ही मागास झाला आहात आता कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात तर आम्ही आमच्यातील काही 11 पोरं सुचवतो त्यांचा विवाह आपल्यामध्ये ठरवूया. आता जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे 11 विवाह जाहीर करू, असं म्हणत जरांगे यांना थेट ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जरांगेंना दिला.

तर लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर हाकेंनी गंभीर टीका केली. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, मागासवर्गीय आहोत. हे मी बोलत नाही तर हे स्वर्गीय एन.डी पाटील बोलायचे, असा दाखला देत. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका हाके यांनी जरांगेंसह मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठ्यांवर केली.