लग्नास नकार दिल्याने दर्शना पवार हिची हत्या

0
791

पुणे, दि. २२ (पीसीबी) – दर्शना पवार हत्या प्रकरणामध्ये आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. लग्नास नकार दिल्याने दर्शना पवार हिची हत्या केल्याचे आरोपिने कबूल केले आहे.
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली होती. दर्शना राजगडावर गेली तेव्हा तिच्यासोबत आरोपी राहुल हंडोरे होते. मात्र गडावरून परतताना राहुल एकटाच होता. दर्शनाचा मृतदेह आढलल्यापासून आरोपी राहुल हा फरार होता. पुणे ग्रामीण पोलीस दलाची पाच पथके राहुलचा शोध घेत होते. अखेर राहुल हंडोरे याला बेड्या ठोकण्यात आले आहेत.

दर्शनाची पवारची हत्या राहुल हंडोरेनेच केली हे पोलीस तपासाकत स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आरोपी राहुल हंडोर पोलीसांना गुंगारा देत फरार होत होता. देशातील अनेक राज्यातून तो फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिुम बंगाल, हरियाणा इथे तो फिरत होता. पुणे ग्रामीण पोलीसाचीपाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आले आहे. अटक केल्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी यासंदर्भात आता पत्रकार परिषद घऊन याबाबत अधिक माहिती दिली आहे.

पोलीस अधिक्षक अंकीत गोयल म्हणाले, दर्शना पवार हिचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर आम्हाला तिच्या शरिरावर काही खुणा आढळून आल्यामुळे याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिस्थितीजन्य पुरावे आढळल्यामुळे आरोप निश्चित केले आहेत. आरोपी राहुल हंडोरेच्या मागावर ग्रामीण पोलिसाचे पाच पथके मागावर होते. त्यानुसार मुंबईतून आरोपील अटक केली आहे. आम्ही आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

आरोपी हा पुण्यात राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करत होता. याआधीही त्याने परिक्षा दिली होती. दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरे हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. आरोपी हा दर्शनाच्या घरच्यांशीही या आधी परिचयात होता. आरोपी राहुल हंडोरेला दर्शनाने लग्नाला नकार दिल्यामुळे हा खून केला असावा, अशी आमची प्राथमिक माहिती आहे. आज आम्ही आरोपील कोर्टात हजर करणार आहोत, पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.