लग्नासाठी दमदाटी करत तरुणीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक

0
442

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – तरुणीने आपल्याशी लग्न करावे यासाठी तरुणाने धमकी देत तरुणीचे अपहरण केले यावरून हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे ही घटना 21 डिसेंबर रोजी हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनी जवळ घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश तुकाराम बुरुटे( रा .शेगाव ,सांगली) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेले माहितीनुसार , आरोपी याने फिर्यादीला तू माझ्याशी लग्न कर नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेन व घरच्यांनाही सांगेन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला त्याच्या रूमवर नेले होते. तेथेही लग्नासाठी जबरदस्ती केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला थोडे समजून सांगितले परंतु त्यानंतरही त्याने फिर्यादीला गाडीत बसून आरोपीच्या गावी घेऊन गेला व तेथे त्याने फिर्यादीला घराच्या खोलीमध्ये डांबून ठेवले. यावरून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.