लग्नाला नकार दिला म्हणून त्याने केली तरुणीची बदनामी

0
237

दिघी, दि. ३० (पीसीबी) – लग्नाला नकार दिल्याने तरुणीची बदनामी केली. तिला शिवीगाळ आणि धमकीचे मेसेज केले. तरुणीच्या होणा-या पतीला फोन करून तरुणीबाबत बदनामीकारक चर्चा केली. ही घटना सन 2013 पासून ऑगस्ट 2022 या कालावधीत वडमुखवाडी येथे घडली.

गोपाळ दत्तात्रय बनसोडे (वय 30, रा. आळंदी देवाची, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपीला लग्नास नकार दिला. त्याचा राग मनात धरून आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. तरुणीच्या ऑफिसच्या मेल आयडीवर शिवीगाळ आणि धमकीचे मेसेज केले. तरुणीचे फेक अकाउंट सुरु करून त्यावर तरुणीचे फोटो अपलोड केले. तरुणीच्या होणा-या पतीला फोन करून तरुणीची बदनामी करत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.