लग्नाबाबत विचारल्याने तरुणीला हातोडीने मारहाण

0
71

चाकण, दि. २० : तरुणीने तरुणाला लग्नाबाबत विचारणा केली. त्या कारणावरून तरुणाने तरुणीच्या डोक्यात हातोडीने मारून तिला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी मार्केट यार्ड चौक, चाकण येथे घडली.

याप्रकरणी जखमी तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक हेमंत लेंडघर (वय २४, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपी अभिषेक याला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावरून अभिषेक याने तरुणीला लग्नास नकार देत हातोडीने तिच्या डोक्यात आणि हातावर मारले. त्यानंतर तरुणीच्या गाडीवर हातोडीने मारून गाडीचे नुकसान केले. तरुणीला त्रास होऊ लागल्याने त्या रुग्णालयात गेल्या असता तिथेही आरोपीने तरुणीला हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.