लग्नापुर्वीच्या मित्राने महिलेच्या पतीला पाठवले अश्लील फोटो

0
380

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) -लग्नापूर्वीच्या मित्राने महिलेसोबत बोलण्यासाठी जबरदस्ती केली. तिच्या पतीला धमकी देऊन महिलेसोबत लग्नापूर्वी काढलेले अश्लील फोटो पाठवले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला.या हा प्रकार ७ मे ते १५ जुलै या कालावधीत तळवडे येथे घडला.

राहुल कैलास जंगम (वय ३१, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांची महिलेच्या लग्नापूर्वी मैत्री होती. महिलेचे लग्न झाल्यांनतर त्याने महिलेच्या पतीला फोन करून, माझ्या मैत्रिणीसोबत लग्न का केले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. तू लग्न केले म्हणून ती माझ्यासोबत बोलत नाही. मी तुला सोडणार नाही. तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. आरोपीने वेगवेगळ्या नंबरवर फोन करून तसेच सोशल मीडियावर मेसेज करून धमकी दिली.

१२ मे रोजी आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला फिर्यादीचे अश्लील फोटो पाठवले. १५ जुलै रोजी आरोपीने फिर्यादीच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट सुरु केले. त्यावर फिर्यादी आणि त्याच्या पतीचा फोटो ठेऊन त्यावरून मेसेज करून फिर्यादीसोबत बोलण्याची धमकी दिली. फिर्यादी जर आरोपीसोबत बोलल्या नाहीत तर तो त्यांचे जुने अश्लील फोटो पतीच्या मित्रांना सोशल मीडियावरुन पाठवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.