लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

0
462

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) – लग्नातील मानपान आणि इतर देण्याघेण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिची सनद घालवण्याची धमकी दिली. हा प्रकार १० जानेवारी २०२१ ते ११ जून २०२२ या कालावधीत जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे घडला.

पती हर्षद शामराव जामखेडकर, सासरा शामराव गंगाधर जामखेडकर, सासू वैशाली शामराव जामखेडकर, दीर तेजस शामराव खेडकर (सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींनी ‘तुझ्या घरून काही आणले नाही. लग्नामध्ये आमचा मानपान केला नाही’ असे म्हणत देण्याघेण्यावरून सतत टोमणे मारून शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी माहेरी असताना आरोपींनी सतत ‘तुझी सनद घालवतो. बघू तू कशी बाहेर काम करते’ असे म्हणून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.