लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

0
198

पिंपरी, दि. २८ – एकाच ठिकाणी काम करत असताना महिलेची जवळीक साधून तिच्यासोबत लग्न करण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. यामध्ये संबंधित महिला गरोदर राहिली. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुदळवाडी चिखली येथे घडला.

प्रदीप बाबासाहेब घाटे (वय 40, रा. देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी काम करीत होते. दरम्यान त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. आरोपी प्रदीप याने फिर्यादी महिलेला लग्नाचे व तिचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवले. त्यातून तिला लॉजवर नेऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये पीडित महिला गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.