लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

0
179

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता दुसऱ्या महिलेसोबत लग्न केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चिंचवड, वाकड, खेड शिवापूर परिसरात घडला.

वैभव मनोहर मोरे (रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव याने महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. फिर्यादीच्या मुलांना मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वैभव याने फिर्यादी महिलेसोबत लग्न न करता दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.