लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

0
215

भोसरी, दि. १ (पीसीबी) – विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगीक अत्याचार केले. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत भोसरी मधील लांडेवाडी आणि एमआयडीसी परिसरात घडला.

मुर्गेशन गिरिराजपिल्लाई श्रीधर (वय 54, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 31) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही विधवा व एकटी आहे याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. नोव्हेंबर 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान महिलेने एका मुलीला जन्म दिला. आरोपीने महिलेसोबत लग्न केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.