वाकड, दि. १३ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०२० ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत डांगे चौक वाकड, वल्लभनगर पिंपरी येथे घडला.
विशाल दिलीप पैठणे (वय २६, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिला डांगे चौक येथील दोन हॉटेलमध्ये तसेच वल्लभनगर येथील घरी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देऊन लग्नास नकार दिला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.