लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार.

0
215

भोसरी, दि.१२ (पीसीबी) – महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराबाबत कोणास काही सांगितले तर महिलेशी संबंध तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना सन २०२२ मध्ये पिंपरी आणि भोसरी येथे घडली.

आदर्श राजकुमार सिंग (वय २३, रा. भोसरी. मूळ रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. महिलेवर प्रेम असून तिच्याशी लग्न करणार असल्याचे त्याने बोलून महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. तरीही आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करून घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर तिच्याशी संबंध तोडून टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.