लग्नाच्या आमिषाने महिलेची सहा लाखांची फसवणूक

0
292

बावधान, दि. १६ (पीसीबी) – मेट्रोमोनीयल साईटवरून संपर्क करून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. आईच्या औषधोपचारासाठी म्हणून महिलेकडून सहा लाख 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना 14 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत बावधन येथे घडली.

एस के शर्मा, अभिषेक शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी भारत मेट्रोमोनीयल साईटवरून संपर्क केला. लग्नाबाबतचा बायोडाटा घेऊन फिर्यादींसोबत लग्न जमावण्याबाबत विश्वास संपादन केला. त्यांनतर आरोपींनी त्यांच्या आईच्या औषधोपचारासाठी म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन माध्यमातून सहा लाख 20 हजार रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.