लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

0
291

थेरगाव, दि. १५ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केला. त्यात मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली. ही घटना १ डिसेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत थेरगाव येथे घडली.

विकास सतिश गायकवाड (वय 32, रा. थेरगाव) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १५ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.