लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर बलात्कार

0
428

चाकण, दि. २९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एकाच कंपनीत काम करणा-या सहकारी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. ही घटना 23 फेब्रुवारी 2020 ते 8 जून 2022 या कालावधीत महाळुंगे येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 28) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान राम बिरादार (रा. रुपीनगर, पुणे. मूळ रा. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे चाकण मधील एकाच कंपनीत काम करत होते. आरोपीने फिर्यादींसोबत मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादींसोबत लग्न करणार असल्याचे वचन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचा लैंगिक छळ करून त्यांनतर त्यांच्यासोबत लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
विवाहितेच्