लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; फसवणूक करत केले दुसरे लग्न

0
766

हिंजवडी, दि. २४ जुलै (पीसीबी) – आधी लग्नाचे वचन देत महिलेवर लैंगिक अत्याचार केले. पुढे दुसरे लग्न करत महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 14 ऑक्टोबर 2021 ते 19 डिसेंबर 2021 या कालावधीत हिंजवडी व वाशी परिसरात घडली.

पीडितेने याप्रकरणी रविवार (दि.23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अविनाश शिवाजी पाटील (वय 31 रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची जीवनसाथी या मेट्रोमोनीअल साईटवर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीला भेटायला बोलावले जबरदस्तीने लैगींक अत्याचार केले. लग्नाचे वचन देत वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर जुलै 2023 मध्ये दुसर्याच मुलीशी लग्न करत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादी यांनी जाब विचारला असता तुला काय करायचे तर कर असे म्हणत शिविगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.