लग्‍नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्‍याचार

0
86

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) : मेट्रोमनी साइटवर ओळख झालेल्‍या एका तरुणीला लग्‍नाचे अमिष दाखवून तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. ही घटना २०२२ ते १ सप्‍टेंबर २०२४ या कालावधीत हिंजवडी आणि लोहगाव येथे घडली. याप्रकरणी एका तरुणावर गुन्‍हा दाखल केला आहे.

अक्षय सुनील आरख (वय २९, रा. मु. पो. ता. साकळी, जि. बुलढाणा) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोहगाव येथे राहणार्‍या २९ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांची बुद्धीष्‍ठ मॅट्रोमनी या वेबसाइटवर ओळख झाली. आरोपी अक्षय याने फिर्यादी यांना इंस्टाग्रामवर मसेज करून लग्‍न करण्‍यासाठी ओळख वाढविली. लग्‍नाचे अमिष दाखवून फिर्यादी यांच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यानंतर लग्‍नास नकार देऊन फसवणूक केली. आरोपी अक्षय याच्‍या मोबाइलवर इतर मुलींचे कॉल व मेसेज येत होते. याबाबत फिर्यादी तरुणीने विचारणा केली असता आरोपीने पिडित तरुणीला मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.