लंडनमध्ये नोकरी लावण्याचा बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

0
106

चिखली, दि. 14 जुलै (पीसीबी) – दोघांना लंडनमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 16 लाख 14 हजार 21 रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 13 जुलै 2024 या कालावधीत पूर्णानगर चिंचवड येथे घडला.

श्वेतांक राजेंद्र शिंदे (वय 28, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरीटकुमार कन्हैयालाल पटेल (वय 43, रा. पूर्णानगर, चिंचवड), किरीटकुमार याची पत्नी (वय 35), किरीटकुमार याची दुसरी पत्नी (वय 40), किरीटकुमार याचा अकाउंटंट गजानन भास्कर देशपांडे (वय 42, रा. देशपांडे गल्ली, आष्टी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी श्वेतांक शिंदे आणि त्यांच्या एका मित्राला लंडनमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले. दोघांचा विश्वास संपादन करून त्यांना नोकरीसाठी डिपॉझिट रक्कम भरावी लागेल, लंडनमध्ये परमनंट व्हिसा काढण्यासाठी व लंडनमध्ये राहण्यासाठी घर भाड्याने घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी करत त्यांच्याकडून 16 लाख 14 हजार 21 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.