रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत

0
14

दि . १८ ( पीसीबी ) – राष्ट्रवादीच्या फूटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये दाखल होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असल्याने अजित पवारांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अशातच अजित पवार यांच्या या दौऱ्यांच्या निमित्ताने रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कर्जत जामखेड या मतदारसंघात रोहित पवारांकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर कर्जत जामखेड यांच्या पावनभूमीत अजित पवार यांचं सहर्ष स्वागत असा मजकूर दिसतोय. तर आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि समस्त कर्जत-जामखेडकर हे स्वागतोस्तुक असल्याचे या बॅनरवर दिसतंय.