रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

0
96
Picture of a numb hand of a woman showing death or unconsciousness

वडिलांच्या तक्रारीनंतर दोन जणांना अटक

भोसरी, दि. ६ (पीसीबी)

रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून एका 12 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भोसरी 6 जून रोजी घडली. वडिलांनि दिलेल्या तक्रारीनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

क्षितीज लक्ष्मण पराड (वय 20, रा. भोसरी) आणि तेजस पांडूरंग पठारे (वय 19, रा. चऱ्होली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी याबाबत शनिवारी (दि. 5) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 12 वर्षींय मुलीने 6 जून रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच मुलीच्या खिशात मिळालेल्या मोबाइल नंबर यावरून आरोपी पराड आणि पठारे यांनी तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिचा लैंगिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.