रोटरी क्लब ऑफ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी” बनवण्याचा उपक्रम घेतला हाती

0
366

पिंपरी,दि ४ (पीसीबी)- रोटरी क्लब ऑफ पिंपरी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्यांना पोर्टा केबिन हॅप्पी स्कूल बनवून देण्याचा असा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या कामी जनसेवा फाउंडेशन पुणे यांचा महत्त्वाचा सहयोग राहणार आहे. जनसेवा फाउंडेशनच्या शिक्षिका अनेक वर्षापासून या वाडी वस्तीतील मुलांना उघड्यावर शिक्षण देण्याचे काम करीत आहेत व पाऊस, ऊन अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या शाळा घेणे त्यांना कठीण होत असल्याचे रोटरी क्लब ऑफ पिंपरी से अध्यक्ष माननीय श्री संजय प्रधान यांच्या निदर्शनास आले दिवाळी दरम्यान गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व फराळाचा वाटप करण्यानिमित्त्याने गेले असता त्यांची या वस्तीतील मुलांशी व तिथे शिकवत असलेल्या महिला शिक्षकांसाठी ओळख झाली.

या नैसर्गिक अडचणी लक्षात घेऊन माननीय श्री संजय प्रधान यांनी हॅप्पी स्कूल पोर्टा केबिन मध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था करून देण्याची कल्पना मांडली व आज रोजी ३१ मार्च तुकाराम मसुळकर पथ पिंपरी येथे प्रथमच अशा प्रकारची ह्प्पी स्कूल सुरू करण्यात आलं आहे व महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र टाॅयलेट देखील केलं आहे. शहराचे आयुक्त व रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे ऑनररी मेंबर श्री शेखर सिंह यांच्या हस्ते ह्या हॅप्पी स्कूलचे उद्धाटन करण्यात आले. त्याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.संजय प्रधान, त्यांचे जेष्ठ बंधु श्री अनिरुद्ध प्रधान, फस्ट लेडी सौ.मधुरा प्रधान अॅनएट संयुक्ता प्रधान व रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अनेक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर रो.नितीन ढमाले रो.बिमल रावत रो.प्रकाश जेठवा रो.श्याम अगरवाल रो.परमानंद जमतानी, रो.नरेंद्र सेठी, रो. डॉ विभा झुत्षी, रो.सदानंद नायक, रो.रमेश कचरू, रो.रोहन रोकडे रो संतोष गिरनजे रो.आनंद संपत रो.कुशल शहा रो.महेश चांडक रो. सूर्यकांत जाधव, एन प्राची जाधव, एन.ख्याती शहा, एन.मीना गुप्ता, .अॅनएट .सलोनी गुप्ता, अॅनएट. खियाना गुप्ता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदालकर सह आयुक्त अण्णा बोदाडे, इंजिनीयर संजय घुबे, आदी मान्यवर उपस्थित होते. तर जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनोद शहा दीपिक्षा चौबे, भारती, मेघा व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी ३५ मुलं उपस्थित होते. रोटरी तर्फे त्यांना युनिफॉर्म, बॅग्स, वॉटर बॅग, दोन वह्या, पेन्सिल यांचे देखिल वाटप करण्यात आला. लवकरात लवकर शहराच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या पोर्टा हॅपी स्कूल ची व्यवस्था करण्यात येईल, असे अध्यक्ष माननीय श्री संजय प्रधान यांनी सांगितले.

मान. अध्यक्ष संजय प्रधान यांनी सांगितले बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी साठी प्राथमिक शिक्षण, औषधे, व पोषण ह्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, व जी या रोटरी ईंटरनॅशनल च्या सात प्रमुख उद्दीष्टांन पैकी एक आहेत व त्या कामी सी.एस.आर व आंतरराष्ट्रीय फंडिंगनद्वरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस हार घालून आयुक्तांनी हा सोहळ्याची सुरुवात केली. बालगोपाळांनी आयुक्तांसाठी राष्ट्रगीत व काही कवितांचे सादरीकरण केले, तर शिक्षिकानी उपस्थित रोटरी क्लबच्या सदस्यांचे व आयुक्तांचे आभार मानले व सुंदर अशा या कार्यक्रमाची सांगता झाली.