रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या अध्यक्षपदी रो दीपक फल्ले व सेक्रेटरी पदी रो सुरेश शेंडे यांची निवड

0
263

पिंपरी दि. ७ (पीसीबी) – रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी च्या अध्यक्षपदी रो दीपक फल्ले व सेक्रेटरी पदी रो सुरेश शेंडे यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल एमराल्ड या ठिकाणी पार पडलायाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्रांतपाल रो मोहनभाई पालेशा तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ने गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट असे प्रकल्प तळेगाव शहर व आजूबाजूच्या परिसरात आयोजित केले होते त्यामुळे रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे नाव शहर आणि परिसरात एका वेगळ्या उंचीवर घेतले जाते .

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीने मावळ तालुक्यातल्या दुर्गम भागात असणाऱ्या शाळांकडे लक्ष द्यावे असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आमदार म्हणून मी संपूर्ण सहकार्य रोटरी सिटीला करेल असे आश्वासन सुद्धा सुनील आण्णा शेळके यांनी दिले अध्यक्षीय भाषणात रोटेरियन मोहनभाई पालेशा यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी प्रांत 3131 मध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला असून आपण ग्रामीण भागात जाऊन शाळा मध्ये आपले कार्य करावे असे आवाहन मोहनभाई पालेशा यांनी केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक फल्ले यांनी आपल्या मनोगतामध्ये तळेगाव शहर व परिसरातील वंचित घटकांसाठी व आजूबाजूच्या गावांमधील शाळांचा विषय हा महत्त्वाचा असल्याने हॅपी स्कूलच्या माध्यमातून या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा मनोदय व्यक्त केला माजी अध्यक्ष रो राजेश गाडे यांनी रो दीपक फल्ले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली तर रो शाहीन शेख यांनी सेक्रेटरी पदाची सूत्रे रो सुरेश शेंडे यांच्याकडे सुपूर्द केली.
या प्रसंगी सह प्रांतपाल रो विलास काळोखे क्लब ट्रेनर रो दिलीप पारेख व मेंबरशीप संचालक संजय मेहता हे उपस्थित होते.या वर्षी 20 नवीन सदस्यांनी रोटरी सिटी मध्ये प्रवेश घेतला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने यावर्षी रोटरी बुलेटीन व रोटरी सिटी न्यूज या चॅनेल चे अनावरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बुलेटिनच्या संपादीका रो रेश्मा फडतरे यांनी सूत्रसंचालन केले तर शरयू देवळे व किरण ओसवाल यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. वैशाली खळदे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचा नियोजन प्रकल्पप्रमुख रो संतोष शेळके व रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी च्या सर्व सदस्यांनी केले