रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या कार्यक्रमातील निधीतून गरजवंत मुलींसाठी सुकन्या प्रोजेक्ट राबविण्यात येणार…

0
409

आकुर्डी,दि.१५(पीसीबी) – रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या वतीने वाॅक डाऊन मेलडी लेन पुरस्कृत आर डी बर्मन नाईट हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून गरजवंत मुलींसाठी सुकन्या प्रोजेक्ट (हिमोग्लोबीन चेक अप व इतर मेडिकल चेक अप) राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी सुमारे 800 श्रोते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटेरियन जसविॅदर सोखी यांनी विशेष परिश्रम घेतले व क्लबच्या अध्यक्षा सौ.कल्याणी कुलकर्णी व क्लबच्या इतर सदस्य तसेच बाहेरील इतर दानदात्यां कडून निधी संकलन करण्यासाठी मदत झाली.