रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 नव्याने भरती

0
216

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 नव्याने भरती झालेल्या लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. ही नियुक्तीपत्रे आज (सोमवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली जाणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार 51 हजार लोकांना विविध विभागांमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे विविध सशस्त्र पोलीस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) तसेच दिल्ली पोलीस भरती या अंतर्गत नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्या 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे देतील. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान तरुणांनाही संबोधित करणार असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे. विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसांनाही सक्षम केले जाणार आहे. यासोबतच दहशतवादाचा सामना करणे, अतिरेक्यांना सामोरे जाणे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणे यासाठी मदत होईल.