रॉपर्टीच्या हिस्यावरून जिवे मारण्याची धमकी देत पत्नी व मेहुण्याकडून मारहाण

0
625

मोशी, दि. २१ (पीसीबी) -प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा म्हणून पत्नी व मेहुण्याने घरात घुसून पतीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हि घटना 9 ऑगस्ट रोजी मोशी येथील मनवा पार्क येथे घडली आहे.

याप्रकर्णी राहूल तुकाराम सस्ते (वय 33 रा.मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पत्नी व मेहुणा शेलैश दत्तात्रय साकोरे (वय 30 रा.मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घरी पत्नी व मेहुणा सरळ घुसले. त्यांनी फिर्यादीकडे संपत्तील हिस्याची मागणी केली. यावेळी पत्नी शिवीगाळ करत सुरी घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून आली. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा पाईप काढण्याचा प्रय़त्न करत जाळून टाकण्याची धमकी दिली. मेहुण्यानेही लोखंडी रॉडने मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले आहे. आरडा-ओरड करत फिर्यादी फिर्यादीला धमकावण्यात आले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.