रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
191

देहूरोड, दि. २८ (पीसीबी) – रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या व्यक्तीस रेल्वेची धडक बसली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २६) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

मयताची ओळख अद्याप पटली नाही. त्याचे वय अंदाजे ४० वर्ष आहे. शरीर बांधा मध्यम, उंची पाच फूट दोन इंच, रंग काळा सावळा, नाक बसके, हाता पायावर जळालेले जुने व्रण, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे ठीपके, नेसनीस खाकी रंगाची कॉटन फुल पॅन्ट, काळ्या रंगाची सॅन्डल घातलेली आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास देहूरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.