रेडझोन मध्ये महापालिकेचेच बेकायदा बांधकाम

0
374

निगडी, दि. १४ (पीसीबी) – आण्णा भाऊ साठे बस स्टॉप शेजारी स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळे बांधकाम संरक्षण क्षेत्रातील बाधित जागेत (रेड झोन) एरियामध्ये बांधकाम करून बांधण्यात आले आहे.या संदर्भात दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगपालिका आयुक्त व स्मार्ट सिटी कार्यालय अॅटो क्लस्टर चिंचवड या ठिकाणी लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले होते.

आज तागायात पिंपरी चिंचवड महानगपालिका व स्मार्ट सिटी यांनी सदर बेकायदेशीर बांधकामा बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. रेड झीन हदीमध्ये नागरिकांना बांधकाम परवानगी देण्यात येत नाही. या उलट पिंपरी चिंचवड महानगपालिका रेड झोन एरियामध्ये स्वतः बेकायदेशीर बांधकाम करून सदर जमिन ठेकेदारास विनामुल्य १५ वर्षे करारनामा करून देत आहे ही अत्यंत गंभिरबाब असून पिंपरी चिंचवड महानगपालिका विकास कामे नावाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत करोडो रुपये जागेचा घोटाळा सदर ठेकेदाराला हाताशी धरून करत आहे.आर्थिक देवाण घेवाण करून स्मार्ट सिटी ठेकेदाराला हाताशी धरून हा सर्व प्रकार केला असून रेड झोन क्षेत्रामध्ये शौचालय व चार दुकानगाळे बांधकाम केलेले आहे.