दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होते. तर अखेर सस्पेन्स संपला आ टीव्हीहे. यंदा भाजपने महिला आमदाराला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिली आहे. भाजप पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या निवडून आलेल्या सर्व 48 आमदारांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पण यंदा भाजपने महिला आमदाराला संधी दिली आहे.
कोण आहेत रेखा गुप्ता?
नुकतचं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला आहे.