रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

0
596

सांगवी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी मध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री पावणेदहा वाजता घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक कदम (वय अंदाजे 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील बजरंग शिस्तारे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमन गिल आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी मधील माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.