रुपीनगर मधून दुचाकी तर चाकण मधून मोबाईल चोरीला

0
256

चिखली, दि. ७ (पीसीबी) – रुपीनगर मधून हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 डिसेंबर रोजी रात्री घडली. तर चाकण येथील माणिक चौकातून एका व्यक्तीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना 5 जानेवारी रोजी घडली. या दोन्ही प्रकरणी शनिवारी (दि. 6) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सचिन विठ्ठल सावळे (वय 22, रा. रुपीनगर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन सावळे हे रुपीनगर येथील कस्तुरी हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/डीपी 8870) 25 डिसेंबर रोजी हॉटेल समोर पार्क केली. हॉटेल समोरून अज्ञाताने सावळे यांची दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

प्रकाश सखाराम जाधव (वय 32, रा. बलुत आळी, चाकण) यांनी मोबाईल चोरी प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. प्रकाश जाधव यांच्या पॅंटच्या खिशातून अज्ञाताने 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.