रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू नि हॉस्पिटल तोडफोड मी सर्व प्रथम त्यामृत आत्म्यास श्रद्धांजली वाहतो,परमेश्वर त्यानासद्गती देवो – डॉ. श्रीकृष्ण जोशी

0
4

कोणत्याही रुग्णाचा मृत्यू ही नातेवाईकांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे…आपल्या प्रियजनाचा मृत्यू आपल्या डोळ्यादेखत आपण अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयात घेऊन जाऊनही होतो आहे… त्यात रुग्णाच्या उपचारावर अमाप… काही वेळा ताकद नसताना जमा केलेलं पैसे खर्च
करूनही यश मिळत नाही त्यावेळी त्या दुःखाची तीव्रता अधिक असते…

डॉक्टरानां सुद्धा रुग्णाचा मृत्यू ही घटना अत्यंत क्लेशदायक असते
हे ही लक्षात घेणें गरजेचे असते …
मला माझ्या ३० वर्ष अनुभवावरून काही गोष्टी यां ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात
पहापटतात का?

सर्वसाधारण कारणे ….

१. डॉक्टर नि रुग्ण याचा समन्वयाचा अभाव त्यामूळे उपाचाराची दिशा कळत नाही
२. अनेक तज्ञ डॉक्टरांचा उपचारात सहभाग नि त्यांनी रुग्णांना दिलेल
वेगवेगळे अपडेट
३. रोजच्या वाढत्या कॉम्प्लिकेशन मुळे रुग्णांच्या नातेवाईकांची
तणावग्रस्त मानसिकता
४. होणाऱ्या आकस्मित अचानक खर्चाच्या जुळवाजुळवी मधे
येणाऱ्या अडचणी व त्यामुळे निर्माण होणारा ताण
५. रुग्णालयातून सातत्याने औषधे, वस्तू, यासाठी तगादा …
६. रुग्णालयात रुग्णाच्या जवळ थांबू अथवा भेटू न दिल्याने वाढता असंशय
७. बिलिंग deptarment मधून एडवांस भरण्यासाठी असणारा दबाव
८. रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरांनी समजाऊन सांगितलेल्या परिस्थिती रुग्ण नातेवाईकांना पुरेशी आकलन झाली नाही तर त्यातून निर्माण होणारे गैरसमज
९. रुग्ण बोलतो, खातो म्हणजे बरा हा गैरसमज
१०. रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयामध्ये असणाऱ्या संवादाचा अभाव अथवा कोरडा आपुलकीचा अभाव असलेला व्यावसायिक पद्धतीचा संवाद…
११. रुग्णालयातून संबधित अथवा इतर स्पेश
लिटी तज्ञ वेळेत आले नाही तर होणारा विलंबामुळे रुग्ण स्थिती गंभीर झाली हा समज

यावरील उपाय…मुख्यतः अतिदक्षता विभागातील रुग्णासंबंधित हॉस्पीटलने घ्यायची सर्व साधारण काळजी

१. रुग्णाला समजेल उमजेल अशा बोलीभाषेत संवाद साधण्याची आवश्यकता ( किमान दिवसातुन दोनदा नि गरजेनुसार )
२. संवादामध्ये माणुसकी, रुग्णाप्रती आपुलकी, नि रुग्ण बरे करण्याची तळमळ आवश्यक
३. रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी पुरेसा वेळ देणे
४. फक्त लेखी कॉन्सेंट घेणे म्हणजे माहिती देणे नव्हे रुग्णाच्या नातेवाईकांना उपचार प्रक्रियेत समावेशित करून घेणे आवश्यक आहे.
५. रुग्णाच्या नातेवाईकामध्ये कोणी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्यास अशा संबंधित नातेवाईकांच्या मदतीने रुग्णास आजाराच्या निदान चाचण्या व औषधोपचार या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर मदत होते…
६. रुग्णास बिलासंदर्भात दिलेला अंदांज नी होणारा खर्च यामध्ये तफावत येणार नाही याची काळजी घेणे
७. आपण संवाद साधताना रुग्णाच्या मानसिक तणावाचा अंदाज घेऊन पारदर्शक संवाद करणे
८. शक्यतो पैसे भरले नाहीत तर टेस्ट अथवा उपचार होणार नाहीत अशी भाषा नको
९. बऱ्याच वेळा कंसलटेंट हे वेळेत उपलब्ध होत नाहीत.. नातेवाईकांची घालमेल होते नि तणाव वाढतो.. ते वेळेत आले नाहीत म्हणून विलंब झाला याविषयी शंका येणे साहजिक आहे.. त्यामुळे ती दक्षता घेणे
१०. रुग्ण मृत्यूच्या शय्येवर असेल… अनेक उपाय करूनही दाद देत नसेल तर सहानुभूती पूर्वक सर्व कर्मऱ्याची वागणूक हवी
११.सिस्टर, वार्ड बॉय यांनी नातेवाईकांना अर्धवट अपडेट देऊ नये..
संबंधित तज्ञाशी सपर्क साधण्यास सांगणे…
१२. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णाच्या मृत्यूची माहिती देताना संवेदनशीलता जपणे

नातेवाईकानी घ्यायची दक्षता

१. आपण तणाव ग्रस्त स्थितीत असतो हे खरे आहे पण डॉक्टर देव नाही तर आपणास मदत करणारा माणूस आहे.. त्याच्याकडून योग्य ती आजाराची परिस्थिती समजाऊन घेणे आवश्यक आहे…
आपणास समजत नसेल अथवा शंका असेल तर आपल्या विश्वासातील डॉक्टर अथवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून समजाऊन घेणे हितावह असते…

२. आपली आर्थिक स्थिती नाजूक असेल तर बऱ्याच वेळा ताण येतो हे खरे आहे.. पण हॉस्पिटल व्यवस्थापनास ही काही समस्या असतात हे ही खरे आहे… आपल्या स्वजनासाठी आपल्यास पैसे उभे करावे लागतात… दुर्दैवाने अशावेळी समाज, नातेवाईक, मित्र मंडळी यांची मदत होतेच असे नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपाय करावे लागतात

३. वैद्यकीय बाबतीत विमा सरक्षण असणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे… त्याचा खर्च हा वायफळ आहे समजू नये … वापरला गेला नाही तर आनंदी व्हावे …

४. बऱ्याच वेळा रुग्णालयात रुग्णास होणारे इन्फेक्शन हे का झाले नि कधी कमी होणार हा प्रश्न पडतो पण याचे नेमके उत्तर हे कालसापेक्ष रुग्ण स्थिती, सुधारणा याचा अंदाज घेऊन डॉक्टर देतात… त्या शब्दात पकडून डॉक्टरांवर संशय घेणे योग्य नाही

५. वेगवेगळे नातेवाईक डॉक्टरकडून माहिती घेऊन नातेवाईकामध्ये पसरवतात त्यामुळे गोंधळ होतो

६. बऱ्याच वेळा एका रुग्णाच्या आजाराशी दुसऱ्या रुग्णाचा संबंध जोडून पहिले जाते… प्रत्येक रुग्ण, त्याचा आजार, अवस्था, करणे, उपचाराला मिळणारा शरीराचा प्रतिसाद वेगळा असतो हे लक्षात घ्यावे

७. जगात ९९ .५ टक्के हुन अधिक डॉक्टर हे रुग्णाच्या हिताचे निर्णय घेऊन काम करतात… त्यांच्यात कोणतीही सूडाची, द्वेषाची भावना असण्याचे काहीही कारण नाही.. किंवा ते धोका व्हावा असे करतील अशी कल्पना ही करू नये

८. बऱ्याच वेळा शरीर औषधोपचार, शस्त्रक्रियेस योग्य प्रतिसाद देत नाही अशा वेळी कृत्रिम श्वास मशीन लावणे, काही विशिष्ट उपचार करणे हे करणे गरजेचे असते… अशा स्थितीतून ही काही रुग्ण बरे होतात परंतु ही वेळ संकटाची, धैर्याची असते… या वेळी सर्वाधिक सहकार्याची व संयमाची अपेक्षा असते..

९. रुग्णांची सर्व उपचार चालू असूनही प्रकृती क्षीण होते, नाडी लागत नाही… हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता थांबते तेंव्हा हृदय पुन्हा चालू करण्यासाठी २- ४ ईच दाब छातीवर देणे गरजेचे असते त्यास सीपीआर म्हणतात… यामुळे अनेक रुग्णाचे हृदय पुन्हा चालू होते… ही शेवटच्या काळी करण्याची शास्त्रीय प्रक्रिया आहे… हाच अखेरचा उपाय असतो.. त्यात काही वेळा बर्गड्याही तुटू शकतात पण जीव संजीवक प्रणाली असल्याने तो करणे गरजेचे असते…
हा प्रकार प्रत्यक्षात नातेवाईकाने पाहणे काही वेळा सहन न होणारे असते हे खरे आहे

१०. प्रयत्नांती अखेर मृत्यू आल्यास ते अंतिम सत्य न आवडणारे, पचणारे, सहन न होणारे असुनही स्वीकारावे लागते…
आपल्या दुःख च्या वेळी थोडा संयम बाळगून आपण मनांत किंतु परंतु आसल्यास कायदेशीर मार्गाने जाऊ शकतो..
पोस्ट martum केल्यास मृत्यूच्या योग्य कारणाचा शोध घेता येतो
हे लक्षात घ्यावे.. बऱ्याच वेळा पोस्ट मारतूम नको हा आग्रह हा अनाठायी असतो…हे लक्षात घ्यावे….

शेवटी आपली लढाई ही आजाराशी आहे… रुग्ण अथवा नातेवाईक याची रुग्णालय, डॉक्टर यांची नाही… तो तात्कालिक संबंध आहे…

मी आशा करतो की असे प्रसंग टाळण्यासाठी आपण उपाय घेऊन पुढे येऊ… समाजांतील गरजू ना समजून घेऊ… डॉक्टरांच्या प्रयत्नाचा आदर करू… परस्पर समजुतीने आणि विश्वासाने प्रामाणिकतेने निरोगी समाज घडवू या….

ही पोस्ट आवडल्यास नावासहीत शेअर करण्यास हरकत नाही. ही कोंडी सोडण्यासाठी आपल्याकडेही काही उपाय असल्यास जरूर कमेंट मधे लिहा…मला आवडेल जाणून घ्यायला….

धन्यवाद !!!