रुग्णवाहिकेने दिली सिमेंट कॉलमला धडक; मद्यपी रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल

0
85

वाकड, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी)
रुग्णवाहिका चालकाने मद्य प्राशन करून रुग्णवाहिका हयगयीने चालवली. रुग्णवाहिकेने महाराष्ट्र कॉलनी, रहाटणी येथे एका घराच्या गेटच्या सिमेंट कॉलमला धडक दिली. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजता घडली.

रवी वासुदेव शर्मा (वय 35, रा. महाराष्ट्र कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुग्णवाहिका (एमएच 14/सीडब्ल्यू 0850) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील रुग्णवाहिका भरधाव, हयगयीने चालवून फिर्यादी यांच्या घरासमोरील गेटच्या सिमेंट कॉलमला धडक दिली. त्यामध्ये भिंतीचे नुकसान झाले असून रुग्णवाहिकेचे देखील नुकसान झाले. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिका चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.