रीक्षाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
198

रावेत, दि. २८ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध व्यक्तीचा भरधाव वेगात आलेल्या रिक्षाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी म्हस्केवस्ती, रावेत येथे घडली.

दामोदर तुकाराम कोंडे (वय ७६, रा. म्हस्केवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षा चालकाने रिक्षा भरधाव वेगात चालवला. म्हस्केवस्ती येथे दामोदर कोंडे हे पायी रस्ता ओलांडत होते. भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने दामोदर यांना जोरात धडक दिली. त्यात दामोदर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता रिक्षा चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.