रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0
262

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी): रिव्हर्स येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी तीन वाजताच्या सुमारास जय हिंद कोलते पाटील लेबर कॉलनी, जांबे येथे घडली.

ट्रॅक्टर चालक रितेश शिवलाल तुनगर (वय 31, रा. आसोला, ता. मानोरा, जि. वाशीम) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सिबुकुमार नेमुलाल शर्मा (वय 19, रा. जय हिंद कोलते पाटील लेबर कॉलनी, जांबे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रितेश याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर रिव्हर्स चालवला. ट्रॅक्टरच्या मागे फिर्यादी यांचा दीड वर्षीय पुतण्या खेळत होता. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक फिर्यादी यांच्या पुतण्याच्या अंगावरून गेले. चाकाखाली चिरडून मुलाचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.