रिवॉर्ड पॉईंट आल्याचे सांगत एक लाखाची ऑनलाईन फसवणूक..

0
299

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) – क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट आल्याचे सांगून त्याबाबत लिंक पाठवून त्याआधारे तरुणाची एक लाख दोन हजार 90 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 27 जून रोजी रात्री मारुंजी येथे घडला.याप्रकरणी नारायण ओमप्रकाश धादीच (वय 25, रा. मारुंजी) यांनी शुक्रवारी (दि. 5) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना अज्ञाताने मेसेज केला. त्यांच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट आले असल्याचे सांगून मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. फिर्यादींनी लिंकवर क्लिक केले असता त्यात क्रेडिट कार्डचा नंबर टाकण्याबाबत विचारण्यात आले. फिर्यादींनी क्रेडिट कार्ड नंबर टाकताच त्यांच्या बँक खात्यातून अज्ञाताने एक लाख दोन हजार 90 रुपये काढून घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.