रिक्षा चोरून दुकानही फोडले

0
94

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी,
मारूंजी येथून रिक्षा चोरून त्‍या रिक्षातून चोरटे शिवतेज नगर येथे गेले. तिथे चोरट्यांनी दुकान फोडून आतील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ४ ऑगस्‍ट रोजी उघडकीस आली.

दशरव रामभाऊ शिंदे (वय ५०, धंदा रिक्षा चालक. रा. शिवतेज नगर, मारूंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. ६) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्‍या मालकीची दीड लाख रुपये किमतीची (एमएच १४ जेपी ०८३३) ही ऑटो रिक्षा चोरून नेली. त्‍या रिक्षातून शिवतेज चौकातील यश एंटरप्रायजेस हे दुकान फोडून दुकानातील तीन लाख रुपये किंमतीचे मोटार रिवायडिंगची कॉपर तार, स्क्रॅप कॉपर तार, केबल वायर असा मुददेमाल घरफोडी चोरी करून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.