रिक्षा चालकाला बेदम मारहाण करून लुटले

0
295

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – रिक्षा चालकाला अनोळखी चार जणांनी बेदम मारहाण करून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन जवळ पिंपरी येथे घडली.

बाबू सुवर्णराव गुंठे (वय 36, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते बुधवारी रात्री साडेदहा वाजता संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन जवळ थांबले असताना आरोपी तिथे आले. हाच आहे, हाच आहे असे म्हणत फिर्यादींना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने फिर्यादींच्या खिशातील साडेसहा हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट आणि आठ हजारांचा मोबाईल फोन असा 14 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.