रिक्षा चालकाचा हलगर्जीपणा बेतला प्रवासी महिलेच्या जीवावर

0
174

निगडी, दि. २८ (पीसीबी) : रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा हयगईने चालवल्याने रिक्षा खड्ड्यात आपटली. त्यामध्ये रिक्षात बसलेल्या प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी थरमॅक्स चौकाजवळ निगडी येथे घडली.

पार्वती गोविंद कल्याणकर (वय 50, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गोविंद माधवराव कल्याणकर (वय 53, रा हडपसर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात येण्यात दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 14/सीयु 3223) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी पार्वती कल्याणकर या 16 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक असा प्रवास करत होत्या. या प्रवासात रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा हयगईने चालवली रिक्षा एका खड्ड्यात आदळली. त्यामध्ये पार्वती कल्याणकर या रिक्षातून बाहेर रस्त्यावर पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.